Violation of code of conduct : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप; निवडणूक आयोगाने घेतली दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपांची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांवर धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारे द्वेष आणि फूट पाडण्याचा आरोप आहे. निवडणूक आयोगाने 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत दोन्ही नेत्यांकडून उत्तर मागितले.