ठाकरे गटाला पुन्हा धक्का : ‘या’ महिला पदाधिकाऱ्याची पक्षाला सोडचिठ्ठी; तसेच दोन महिला नेत्यांच्या नावे थेट तक्रार

सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशातच ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाहीये. शिल्पा बोडके यांनी पक्षाला रामराम केला आहे. शिल्पा बोडके या विदर्भ महिला आघाडी संपर्कप्रमुख आणि प्रवक्ता होत्या. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर आपल्या पक्षाचा राजीनामा पोस्ट केला आहे.