Sanjay Raut : ” भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं ! गोमांस निर्यात करणाऱ्यांकडून भाजपने कोट्यावधींचा निधी घेतल्याचा संजय राऊतांचा घणाघाती आरोप

लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तसे पक्षाचे प्रमुख नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. एकीकडे भाजपच्या नेत्याने थेट शाहू छत्रपतींना खरे वारसदार आहात का ? असा सवाल केला तर आता संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून कोट्यावधींचा निधी घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.