” किती गोळ्या घालायच्या तेवढ्या घाला, मी मागे हटणार नाही..! ” सुजय विखेंच्या बाबत व्हायरल झालेल्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपने अहमदनगरमध्ये खळबळ

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील Sujay Vikhe यांच्याबाबत एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये सुजय विखे यांना गोळी घालण्याची धमकी देण्यात आल्याचं समजते आहे. यामुळे अहमदनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.