मोठी बातमी : नरेंद्र मोदी 9 जूनला घेणार पंतप्रधान पदाची शपथ ! NDA च्या नेतेपदी निवड

लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 तर एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. देशांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 272 एवढे बहुमत आवश्यक आहे. त्यामुळे आता एनडीएने पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांना पुन्हा एकदा एनडीएच्या नेतेपदी निवडले आहे. तरी येत्या 9 जूनला नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे.