NANA PATOLE : ” किती जागा पाहिजे सांगा ? अजूनही वेळ गेलेली नाही…! ” नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना थेट ऑफर, नेमकं काय म्हणाले ? वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते हे महाराष्ट्रभर दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोल्यामध्ये आहेत. अकोल्यातील त्यांच्या विधानाने आज राजकीय वर्तुळात चर्चेला नवीन विषय दिला आहे. आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना परत येण्याची थेट ऑफर दिली आहे.