Maharashtra Politics : मंत्री धर्मराव आत्राम यांचा गौप्यस्फोट; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 4 जूननंतर भाजपमध्ये सामील होणार ! राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्रमध्ये लोकसभा निवडणुका जाहीर होताच अनेक मोठमोठ्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विजय वडेट्टीवार यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.