MARATHA RESERVATION : … अन्यथा पुन्हा मुंबईत येणार ! जरांगे पाटील यांची प्रकृती खालावतेय, पण मागणीवर ठाम !

जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू आहे. दहा फेब्रुवारीपासून हे आमरण उपोषण सुरू झाले आहे. काल अचानक त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणावर खालावली होती. नाकातून रक्तस्त्राव झाला त्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आली होती.