Maratha Reservation : जरांगे पाटलांचे भगवे वादळ पुण्यात ! भव्य सभेचे आयोजन; आज पदयात्रेचा पाचवा दिवस, पुढच्या 2 दिवसात मुंबईत धडकणार

मराठा समाजाला सरसकट आरक्षण Maratha Reservation दिलं जावं या मागणीसाठी गेली कित्येक महिन्यांपासून मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत होते. परंतु आपल्या मागण्यांना सरकार मान्य करत नाही आणि दिलेली आश्वासन पूर्ण होत नाहीत याचा अंदाज घेऊन 20 जानेवारी पर्यंत सरकारनं योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा मुंबईमध्ये पाई यात्रा करून येणार आणि आंदोलन करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यानुसार आज या पदयात्रेचा पाचवा दिवस आहे.