Kolhapur Lok Sabha Constituency : ” कष्ट करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही..! ” संभाजीराजेंचा शाहू छत्रपतींना स्पष्ट पाठिंबा

कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठीच्या महाविकास आघाडीचा जो तिढा होता तो आता सुटला आहे. काँग्रेस आणि शिवसेना दोघेही या जागेसाठी आग्रही होते. काँग्रेसला ही जागा शाहू छत्रपतींसाठी हवी होती. आजच्या निर्णयाक बैठकीमध्ये अखेर शिवसेनेने माघार घेतली आहे. आणि आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही शाहू छत्रपती लढवणार आहेत.