Pune Politics : ” सुनेत्रा पवारांना आई मानता तर पाठिंबा पण द्या ” दीपक मानकरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

लोकसभा निवडणुकीच्या तारखा ठरल्या आहेत. प्रत्येक पक्षांमधून उमेदवारांची नावे जाहीर होत आहेत. काही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात देखील केल्याची चित्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज पुण्यामध्ये महायुतीची पुणे, शिरूर, बारामती लोकसभा मतदार संघातील महिला आघाडीची बैठक पार पडली. भाजपचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी या बैठकीला मार्गदर्शित केले.