बारामतीत हायव्होल्टेज ड्रामा : सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या बंगल्यावर, राजकीय वर्तुळात खळबळ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारकी मिळवण्याच्या शर्यतीत अनेक कुटुंबांमध्येच लढत होत असल्याच चित्र पाहायला मिळाल आहे. यातलं सर्वात गाजणार कुटुंब आहे ते म्हणजे पवार कुटुंब…बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे अजित पवारांच्या बंगल्यावर गेल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे.