Hemant Godse : नाशिकच्या लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत घमासान ; ‘हेमंत गोडसेचं निवडणूक लढवणार !’ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ

नाशिकमध्ये महायुतीचा अद्याप देखील तिढा सुटलेला नाही. जागावाटप आणि उमेदवारी नेमकी कोणाला ? याबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच आता शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नाशिक मधून हेमंत गोडसे निवडणूक लढवणार असे ठाम विधान केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.