” अजित काम करतो पण या सगळ्याचा पाया शरदने घातलाय..! ” शरद पवारांच्या बहिण सरोज पाटील यांनी स्पष्टच सांगितले; भाजपवर गंभीर आरोप…

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त गाजणार आहे ती बारामती मतदार संघाची निवडणूक… ही निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी राजकीय तर आहेच, त्याचबरोबर ती आता कौटुंबिक झाली आहे. या वादामध्ये आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी देखील अजित पवार आणि भाजपवर सडेतोड टीका केली आहे.