BIG NEWS : गणपत गायकवाड यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक; गृहमंत्र्यांकडे शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

दोन दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला. या भयंकर घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये हा हल्ला किती भयंकर होता हे दिसून येते.