Ahmednagar : ” आम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो..” अमोल कोल्हेंची अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुजय विखेंवर नेमक्या शब्दात कडवी टीका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते पदाधिकारी आपल्या उमेदवारासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. नुकतीच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी अहमदनगरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुतीचे भाजपच्या वतीने लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुजय विखे यांच्यावर मोजक्या शब्दात जहरी टीका केली आहे.