पाणी जपून वापरा ! महाराष्ट्रातील सावरखेडा गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण, 200 फुट दरीमध्ये उतरून हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत

सोयगाव तालुक्यात दुष्काळाची झळा गडद होताना दिसत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न बिकट होत आहे. तालुक्यातील दुर्गम भागात असलेले व तीनशे लोकांची वस्ती असलेले सावरखेडा (ब) पांढरी या गावात अक्षरशः महिलांना दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून दोनशे फुटाच्या दरीमध्ये खाली उतरून हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.