मोठी कारवाई : गॅस सिलेंडरची अवैध वाहतूक साठवणुकीवर कारवाई; अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून 32 लाख 72 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

अन्नधान्य वितरण कार्यालयाच्यावतीने मोरे वस्ती, चिखली, पिंपरी चिंचवडमध्ये छापा टाकून मामा गॅस सर्विस एजन्सीविरुद्ध गॅस सिलेंडरची अवैध साठवणूक, वाहतूक या अनुषंगाने मोठी कारवाई करण्यात अली आहे.