Davos Conference : 3 लाख 10 हजार कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात होणार ! मुख्यमंत्र्यांची प्रमुख उद्योजक, गुंतवणूकदार, विविध देशांच्या नेत्यांसमवेत चर्चा

महाराष्ट्रासाठी रोजगाराच्या दृष्टीने एक चांगली बातमी आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी १६ जानेवारी रोजी दावोस येथे शिष्टमंडळासमवेत उपस्थित राहणार असून या परिषदेतील प्रमुख बैठकीत ते “नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.