महाराष्ट्र हादरला ! उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार; गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधक आक्रमक VIDEO

सध्या भाजप आणि शिंदे गट हे सत्तेत आहेत. असं असताना आज उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्येच गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. कल्याण डोंबिवलीच्या उल्हासनगरमध्ये भाजप आमदारांन शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर थेट गोळीबार केला आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला आहे.