Krishi Udan Yojana 2.0 : शेतकऱ्यांचे उत्पादन देश-विदेशात बाजारपेठांपर्यंत पोहोचणार; देशातील एकूण 58 विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना 2.0’ अंतर्गत समावेश

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यापासून ते उत्पन्नाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रशासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ मिळावी यासाठी केंद्र शासनाने देशातील एकूण 58 विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना 2.0’ Krishi Udan Yojana अंतर्गत समावेश केला आहे.